ब्रेकिंग
ताज्या बातम्यांसाठी संवाद न्यूज वाचत राहाआपल्या शहराच्या बातम्या आता आपल्या मोबाइलवरसंवाद न्यूजला सोशल मीडियावर फॉलो करा
राजकारण

शेतकरी, दुधसंस्था आणि गोकुळ वाचवण्यासाठीच आमचा लढा : आ. सतेज पाटील 

शेतकरी, दुधसंस्था आणि गोकुळ वाचवण्यासाठीच आमचा लढा : आ. सतेज पाटील 
शेतकरी, दुधसंस्था आणि गोकुळ वाचवण्यासाठीच आमचा लढा : आ. सतेज पाटील  | sanvadnews

कोल्हापूर : स्व. आनंदराव चुयेकर साहेबांनी उभारलेला गोकुळचा वारसा पुढे नेण्याची आमची बांधिलकी आहे. आमची लढाई सत्तेसाठी नसून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय, प्रतिष्ठा आणि त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आहे. आम्ही मल्टिस्टेटचा प्रयत्न हाणून पाडला, त्यामुळेच गोकुळच्या सातबाऱ्यावर दूध उत्पादकांचे नाव कायम राहिले. शेतकरी आणि दूध उत्पादक संस्था हा गोकुळचा पाया असून त्यांना वाचवण्यासाठीच आमचा लढा सुरू आहे. अशा भावना काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक ( गोकुळ) दुध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी राजर्षी शाहु शेतकरी समविचारी आघाडीच्या ठरावधारकांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी आघाडीकडून १,८५१ ठराव सह. उपनिबंधक दुग्ध विकास विभागाकडे सादर केले.

आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या मेळाव्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, आ. राजीव आवळे आणि श्री दत्त सहकार समुहाचे अध्यक्ष गणपतरावदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.याबरोबरच गोकुळच्या सभासद संस्थाचे ठरावधारक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आघाडीकडून १,८५१ ठराव दूध विकास विभागाकडे सादर केले.

यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी म्हणाले की गोकुळ ही केवळ एक सहकारी संस्था नाही, तर ती कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची कामधेनु आणि अस्मिता आहे. या संस्थेचे रक्षण करणे हे प्रत्येक सभासदाचे कर्तव्य आहे. गोकुळच्या प्रगतीमध्ये आपल्या माता-भगिनींचे, महिला दूध उत्पादकांचे योगदान सर्वात मोठे आहे. गोकुळला राजकीय अड्डा बनण्यापासून रोखायला पाहिजे. अमूल सारख्या बड्या दूध संस्थेला गोकुळच्या बरोबरीने दर देता आले नाही हि वस्तुस्थिती आहे.गोकुळ दुध संघ मल्टीस्टेट झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहणार आहे.

यावेळी जेष्ठ नेते गोपाळराव पाटील, रणजीतदादा मुरगुडकर, रामराजे कुपेकर, सत्यजित जाधव, राहुल देसाई, हिंदुराव चौगले, पी. डी. धुंदरे, ए. डी. पाटील, सदाशिव चरापले, अंजनाताई रेडेकर, एम. आर. पाटील- कुरुकलीकर, शशिकांत पाटील- चुयेकर, बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, उदय पाटील, दिनकरराव कांबळे, उदयानी साळुंखे, स्मिता गवळी, बजरंग पाटील, शामराव देसाई, संभाजीराव देसाई, दरगु गावडे, दयानंद पाटील, प्रशांत देसाई, निवास पाटील, भगवानराव जाधव, रामकृष्ण पाटील, रणधीर मोरे, छाया देसाई, एकनाथ पाटील, सचिन घोरपडे, जीवन पाटील, विक्रम चव्हाण- पाटील, विद्याधर गुरबे, गणपतराव डोंगरे, अमर पाटील, महेश पाटील- शिंगणापूरकर, शशिकांत खवरे, सम्राट मोरे, प्रकाशराव पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेता राजू लाटकर, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, मधुकर रामाणे, सर्व जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक व आजी- माजी पदाधिकारी आणि ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बातमीबद्दल मित्रांना सांगा:
V
Vijay Powar
संवाद न्यूज
संवाद न्यूजचे अनुभवी पत्रकार. महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल वार्तांकन करतात.

संबंधित बातम्या

दैनिक न्यूजलेटर

दररोज सकाळी ताज्या बातम्या, विश्लेषण आणि विशेष लेख थेट तुमच्या इनबॉक्समध्ये मिळवा.

स्पॅम नाही. कधीही सदस्यता रद्द करा.