ब्रेकिंग
ताज्या बातम्यांसाठी संवाद न्यूज वाचत राहाआपल्या शहराच्या बातम्या आता आपल्या मोबाइलवरसंवाद न्यूजला सोशल मीडियावर फॉलो करा
राजकारण

शिरोलीतील अतिक्रमणे कायम करा अन्यथा धडक मोर्चा : शिवसेनेचा इशारा

शिरोलीतील अतिक्रमणे कायम करा अन्यथा धडक मोर्चा : शिवसेनेचा इशारा
शिरोलीतील अतिक्रमणे कायम करा अन्यथा धडक मोर्चा : शिवसेनेचा इशारा | sanvadnews

शिरोली : शिरोली पुलाची गावातील शासन निर्णया प्रमाणे २०११ पर्यंतची सर्व अतिक्रमणे त्वरीत कायम करावीत अशा मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी गीता कोळी यानां देण्यात आले. अतिक्रमणे कायम करण्याची त्वरीत कार्यवाही न केल्यास शिरोली ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढू असा इशारा देण्यात आला.
माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, माजी पं.स. सदस्य अनिलराव खवरे, माजी उपसरपंच सुरेश यादव यांच्या नेतृत्वा खाली दिलेल्या निवेदनात म्हंटले आहेकी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे शासननिर्णय अतिक्रमित करणेत घेऊन सुधारित व एकत्रित शासन निर्णय अतिक्रमणे नियमानुकुल करणेचे आदेश आपल्या ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला आहे, पण आपल्या शिरोली ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमणे नियमानुकुल करण्यासाठीची हालचाली गतीमान दिसून येत नाहीत. गावातील अतिक्रमण धारकांना रहिवासी पुरावा देणेसाठी ग्रामपंचायत प्रशासन अतिक्रमण धारकांना वेठीस धरत आहेत.
ग्रामपंचायत दप्तरी अतिक्रमण धारकांच्या नोंदी उपलब्ध असताना, लोकांना नाहक त्रास देणेचा प्रयत्न चालू आहे. ग्रामपंचायतीने अतिक्रमण धारकांना, ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण नोंद दप्तरीतील घरठाण उतारा देणेसाठी स्वतंत्र यंत्रणा राबवावी, म्हणजे अतिक्रमण धारकांचा नाहक त्रास वाचेल. सन २०१८-२०१९ मध्ये ऑनलाईन अतिक्रमण नोंदी झालेली व चुकलेली अतिक्रमणे फेर नोंदी घेऊन अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे नियमानुकुल करावीत, यामध्ये जर ग्रामपंचायत प्रशासनाने टाळाटाळ केल्यास अतिक्रमण धारकांच्यावतीने धडक मोर्चा काढणेत येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी राजकुमार पाटील शिवसेना शहर प्रमुख, शिवाजी पोवार पाटील, अशोक खोत शिवसेना उपशहर प्रमुख, मुकुंद महादेव नाळे शिवसेना उप शहर प्रमुख,संतोष बाटे, नितिन दळवी
नितिन चव्हाण, विनायक पाटील, राम झालटे, विशाल पोवार,
शंकर गोसावी, सतिश रेडेकर उपास्थित होते.

या बातमीबद्दल मित्रांना सांगा:
V
Vijay Powar
संवाद न्यूज
संवाद न्यूजचे अनुभवी पत्रकार. महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल वार्तांकन करतात.

संबंधित बातम्या

दैनिक न्यूजलेटर

दररोज सकाळी ताज्या बातम्या, विश्लेषण आणि विशेष लेख थेट तुमच्या इनबॉक्समध्ये मिळवा.

स्पॅम नाही. कधीही सदस्यता रद्द करा.